शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे सहकार्य नसल्याने कल्याण पत्रीपूलाचे बांधकाम रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 16:27 IST

कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.

ठळक मुद्देकल्याण डोंबिवली शहरातील काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.महिना झाल्यानंतरही काम बंद का? असा सवाल पवार यांनी एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना विचारला.रेल्वेने सहकार्य केल्यास आगामी वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पवार यांना दिले.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. त्यावेळी महिना झाल्यानंतरही काम बंद का? असा सवाल पवार यांनी एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना विचारला. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानगी मिळण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी तात्काळ खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधत लवकरच तोडगा काढला जाईल, पण कामाला सुरुवात करा काम बंद ठेवू नका असे स्पष्ट केले.

रेल्वेने सहकार्य केल्यास आगामी वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पवार यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल,सल्लागार एल.एन.मालविय उपस्थित होते. गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने ६ तासांचा पॉवर ब्लॉक वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेला ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा जुना पत्री पुल पाडला. त्यानंतर या जागेवर नवा पुल अत्यंत जलद पणे उभारू असे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र आता त्यास महिनाभर उलटून गेल्यानंतरही काम कुर्म गतीने सुरू असल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

पूल पाडल्याने वाहतूकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असणाऱ्या नव्या पुलावर येत आहे. तेथेही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीकरांना करावा लागतो. वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग नीट माहिती देत नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच थेट भेट देत सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सुटी असतानाही धावाधाव झाली. यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतूकीवर येणारा ताण लक्षात घेता सबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्री पुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वे