ट्रक अडकल्याने कल्याण-कसारा रेल्वेसेवा ठप्प

By Admin | Updated: June 29, 2015 02:43 IST2015-06-29T02:43:51+5:302015-06-29T02:43:51+5:30

आंबिवली-टिटवाळा रेल्वेमार्गावरील रेल्वे गेटमध्ये ट्रक अडकल्याच्या घटनेमुळे कल्याण-कसारा मार्ग अप/डाऊन दोन्ही दिशांवर ठप्प झाला होता.

Kalyan-Kasara railway service stopped after a truck collided | ट्रक अडकल्याने कल्याण-कसारा रेल्वेसेवा ठप्प

ट्रक अडकल्याने कल्याण-कसारा रेल्वेसेवा ठप्प


डोंबिवली : आंबिवली-टिटवाळा रेल्वेमार्गावरील रेल्वे गेटमध्ये ट्रक अडकल्याच्या घटनेमुळे कल्याण-कसारा मार्ग अप/डाऊन दोन्ही दिशांवर ठप्प झाला होता. ही घटना रविवारी दुपारी ४च्या सुमारास घडली. डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर त्यापाठोपाठ सुरक्षिततेच्या दृष्टीने अपची वाहतूकही बंद करण्यात आली होती.
मेगाब्लॉक असल्याने कळवा-ठाकुर्लीचे प्रवासी मेटाकुटीला आले असतानाच या घटनेमुळे प्रवाशांचा सुटीच्या दिवसावर पाणी फिरले. पावसाने दडी मारलेली असतानाच आणि शाळाही सुरू झाल्याने सुटीच्या दिवसात कुटुंबासह बाहेर पडले होते, त्यांना या घटनेमुळे त्रास झाला. अनेक प्रवासी महागणपतीच्या दर्शनासाठी आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kalyan-Kasara railway service stopped after a truck collided