शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

कल्याण-डोंबिवलीत आता स्मार्ट बसथांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:57 AM

स्मार्ट सिटीअंतर्गत विकास : कंत्राटदार नेमणार

कल्याण : तुटलेले, गंजलेले, अशा दयनीय अवस्थेतील केडीएमटी बसथांबे कल्याण-डोंबिवलीत शहरांतील विविध भागांमध्ये पहायला मिळतात. परंतु, आता हे चित्र बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उच्च प्रतिचे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी बसथांबे केडीएमटीकडून उभारण्यात येणार आहेत. याकामी अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे केडीएमसी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास, व्यवस्थापन आणि सुशोभीकरण करणार आहे. परिवहन उपक्रम हा नागरिकांना वाहतूक सेवा पुरवणारा उपक्रम असल्याने ‘वाहतूक व्यवस्थापन’ या अंतर्गत परिवहन उपक्रमाची भूमिका स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाची राहणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील बसथांब्यांची उभारणी त्यांच्यावतीनेच केली जाणार आहे. परंतु, त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अन्यत्र बसथांब्यांची उभारणी केडीएमटी उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. सद्यस्थितीला उपक्रमाचे १२४ बसथांबे आहेत. तर प्रस्तावित थांबे ११९ आहेत.संबंधित प्रस्तावानुसार बसथांब्यांची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे, फ्लोरिंग दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यकतेनुसार नवीन बसथांबे उभारणी करणे आदी जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे. याकामासाठी गुरुवारी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केडीएमसी हद्दीत १५० नवीन बसथांबे उभारण्यात येणार आहेत. परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरील चर्चेच्यावेळी २०० थांबे उभारावेत, अशी मागणी भाजप सदस्य संजय मोरे यांनी केली. तर या थांब्यावर बसक्रमांकासह बस कुठल्या मार्गावर धावणार, याचाही उल्लेख असावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.उत्पन्नवाढीसाठी होर्डिंग पॅनलद्वारे जाहिराती कराच्परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार, बाळासाहेब ठाकरे आगार (वसंत व्हॅली) आणि खंबाळपाडा आगारात होर्डिंग पॅनलद्वारे जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी ई निविदा प्रक्रियेद्वारे अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही गुरुवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.च्तिन्ही आगारांच्या दर्शनी भागात होर्डिंग उभारल्यास विविध संस्था परिवहन प्रशासनाकडे मागणी करतील आणि उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा प्रस्ताव ६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या परिवहनच्या बैठकीत तत्कालीन सदस्य संतोष चव्हाण यांनी मांडला होता. त्याला समितीने मान्यता दिली होती. त्याप्रमाणे या प्रस्तावाची अंमलबजावणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा विषय प्रशासनाकडून गुरुवारी दाखल करण्यात आला.च्सध्या उपक्रमाच्या कार्यरत बस आणि बसथांब्यांवर जाहिरात प्रदर्शित करण्यात येत आहेत. परंतु, अद्यापी उपक्रमाच्या आगाराच्या चोहो-बाजूने होर्डिंगद्वारे जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी कोणत्याही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. यावर संबंधित प्रस्तावाला मान्यता देताना उपक्रमाचे आरक्षित असलेले इतरही भूखंड ताब्यात घेऊनही उत्पन्न वाढीसाठी उपक्रम राबवा, अशीही सूचना सदस्यांनी केली.

टॅग्स :kalyanकल्याण