शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जिल्ह्यात सर्वाधिक रेमडेसिविरचा वापर कल्याण-डोंबिवलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या मनमानी वापरामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या मनमानी वापरामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा जवळपास ९० टक्के वापर‌ केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अन्य शहरांंच्या तुलनेत कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ७२ रुग्णालयांचा समावेश असल्याचे अहवालाअंती उघड झाले आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये नियमास अनुसरून २५ तर ३० टक्के रुग्णांसाठीच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होत आहे. या इंजेक्शन्सच्या मनमानी वापरामुळे जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा झाला. मात्र, आता रुग्णवाढीचे व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्यामुळे या औषधींचा पुरवठाही सुरळीत होत असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त पी.बी. मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आयसीएमआरच्या निकषास अनुसरून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत ५० टक्के पुरवठा नेहमीप्रमाणे होत असल्याचेही मुंदडा यांनी सांगितले. जिल्हाभरातील रुग्णालयांनी आतापर्यंत एक लाख एक हजार ७२० रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली आहे. त्यातुलनेत ५१ हजार‌ ६८५ इंजेक्शन मेडिकलऐवजी सरळ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. यातील २ हजार २६० इंजेक्शनचा २२६ रुग्णालयांना शुक्रवारी पुरवठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इंजेक्शन्स कल्याण - डोंबिवली शहरातील ७२ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. या शहरांमधून ५ मेपर्यंत ३२ हजार २७८ इंजेक्शनची मागणी नोंदवली असून, जिल्ह्यात सर्वात जास्त तब्बल १४ हजार ६६९ इंजेक्शनच्या पुरवठा या शहरात झाला आहे. यामध्ये ६ ते ८ मेच्या पुरवठ्याचा समावेश केल्यानंतरही या शहरात सर्वाधिक रेमडेसिविरचा वापर होत असल्याचे उघड होत आहे.

----------

पूरक जोड आहे.