कल्याण खाडी विकास एप्रिल अखेरपर्यंत
By Admin | Updated: March 30, 2017 04:04 IST2017-03-30T04:04:48+5:302017-03-30T04:04:48+5:30
महाराष्ट्र मेरीटाइम बोडामार्फत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील गणेशघाट ते वाडेघरपर्यंतच्या खाडी किनाऱ्याला

कल्याण खाडी विकास एप्रिल अखेरपर्यंत
मुंबई : महाराष्ट्र मेरीटाइम बोडामार्फत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील गणेशघाट ते वाडेघरपर्यंतच्या खाडी किनाऱ्याला संरक्षण भिंत, जेट्टी व पोहोचरस्ता तयार करण्याचे काम एप्रिल २०१७ अखेर पूर्ण करण्यात येईल, असे बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला लागून असलेल्या खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत गणेशघाट ते वाडेघरपर्यंत संरक्षण भिंत, जेट्टी व पोहोचरस्ता तयार करण्यासाठी ४५० मीटरपर्यंत काम सुरू करण्यात आले असून, ते येत्या एप्रिलअखेर पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी एकूण ४ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, सदर अंतर ८ किमी आहे. आतापर्यंत ३००हून अधिक मीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीने निधी दिला आहे. आगामी काळात युनिफाईड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्यासाठी आठ ठिकाणचा अभ्यास करण्यात येत असून, यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.मोनो रेलची भाडेवाढ नाही मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अनंत गाडगीळ यांच्या इतर एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे याबरोबरच मुंबईकरांना प्रवासासाठी मोनो रेल सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सध्या मोनो रेलच्या सुरक्षेसाठी २० ते २५ टर्क्क खर्च करण्यात येत आहे. मोने रेलचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. पण, त्यामुळे मोनो रेलचे भाडे वाढविले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)