Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी

By मुरलीधर भवार | Updated: November 7, 2023 18:32 IST2023-11-07T18:31:50+5:302023-11-07T18:32:04+5:30

Kalyan News: दिवाळीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारुन केली.

Kalyan: Additional Commissioner of KDMC conducted a cleanliness inspection on a bike | Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी

Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी

- मुरलीधर भवार

कल्याण - दिवाळीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारुन केली.

दिवाळी निमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबविणयाचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी आज सकाळी कल्याण परिसरात स्वत: दुचाकी चालवित स्वच्छतेची पाहणी केली.

वसंत व्हॅली, मोहन अल्टिझा, युनिव्हरसिटी रोड, गोदरेज हिल परिसर, जेल रोड, बिर्ला कॉलेज रोड या परिसरात दुचाकी वरुन स्वत: फिरत परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी रस्ते स्वच्छ ठेवणेबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. या पाहणीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या आरोग्य निरीक्षकास नोटीस बजाविण्यात याव्यात असे आदेश चितळे यांनी दिले आहेत. याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी मोहिनीश गडे, स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Kalyan: Additional Commissioner of KDMC conducted a cleanliness inspection on a bike