शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

बनावट नोटा बनविणाऱ्या काळूराम इंदवाळेला ठाण्यातून अटक : दोन लाख ८३ हजारांच्या नोटा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:35 IST

२० हजारांच्या बदल्यामध्ये ५० हजारांच्या बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या काळूराम इंदवळे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पाचशेच्या बनावट नोटांसह ती बनविण्याची सामग्रीही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५०० रुपये दराच्या ५६६ नोटांसह नोटा बनविण्याची सामुग्रीही हस्तगतइगतपूरी येथे केली कारवाई२० हजारांच्या बदल्यात ५० हजारांच्या बनावट नोटा

ठाणे: बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या काळूराम बुद्धा इंदवाळे (रा. कसारा, शहापूर, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून पाचशे रुपये दराच्या दोन लाख ८३ हजारांच्या ५६६ बनावट नोटा तसेच त्या बनविण्याची सामुग्रीही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपकउ देवरात यांनी शुक्रवारी दिली.बनावट नोटा चलनात येऊ नये यासाठी खबरदारी घेऊन कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त देवराज यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांना दिले होते. याच अनुषंगाने आपल्या बातमीदारांमार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाकडून माहिती काढण्यात येत होती. भारतीय चलनातील पाचशे रुपये दराच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील हायवे हॉस्पीटलसमोरील आरटीओ कार्यालयाजवळ येणार दोघेजण येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुुक्त सुरेश मेकला आणि अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रणवरे यांच्यासह एपीआय पवार, उपनिरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, भूषण शिंदे जमादार बाबू चव्हाण आणि दिलीप तडवी आदींच्या पथकाने १२ आॅगस्ट रोजी आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचून काळूराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या ५६६ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बनावट चलन बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. त्याला १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याच चौकशीदरम्यान १४ आॅगस्ट रोजी इगतपूरी (नाशिक) येथून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी सामुग्री त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. यामध्ये दोन मॉनेटर, सीपीओ, हार्डडिस्क, स्कॅन प्रिंटर, बनावट नोटा तयार करण्यासाठी उपयोगात येणारे वेगवेगळया आकाराचे आणि जाडीचे सफेद रंगाचे कागद, बनावट नोटा टाकून त्यावर इस्त्री फिरविण्यासाठी उपयोगात येणारी २०० पाकिटे, ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या कट करुन उरलेले सफेद रंगाचे सात कागद, महात्मा गांधाचा फोटो असलेला छापा, इलेक्ट्रीक वजन काटा तसेच बनावट नोटा हवा मारुन सुकविण्यासाठी उपयोगात येणारी हिरव्या रंगाची इलेक्ट्रीक मशिन ही सर्व सामुग्री त्याच्या इगतपुरी येथील छापखान्यातून पोलिसांनी जप्त केली. त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, त्याने यापूर्वी कोणाला अशा नोटा वटविल्या आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे देवराज यांनी सांगितले.संगणकावर स्कॅन करुन प्रिंटरने ५०० आणि दोन हजार तसेच २०० रुपयांच्या नोटा काळूराम इंदवाळे हा छापत होता. २० हजारांच्या ख-या चलनी नोटांच्या बदल्यामध्ये ५० हजारांच्या या बनावट नोटा तो विक्री करण्याच्या बेतात असतांनाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी