शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही : प्रकल्पांचा घेतला आढावा, ठाणे जिल्ह्याची टंचाई दूर होण्याची चिन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:26 IST

Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

ठाणे : न्यायप्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यापाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. यामुळे काही ठिकाणी कमी पाणी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणीपुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे लागणार आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

एमआयडीसीला एसटीपी प्लांटचे पाणी बंधनकारकजिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रिसायकलिंगच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एमआयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लांटचा वापर करून रिसायकलिंग करून वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी मोठे प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टास्क फोर्सपाइपलाइन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे ते म्हणाले.

येऊर बंधाऱ्याची दुरुस्ती येऊर येथील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यातील पाण्याचा वापर ठाण्याच्या काही भागाला होईल. मुंब्रा परिसरातील डोंगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापुरी बंधारे बांधून त्याचा वापर कळवा आणि मुंब्रा येथे करून पाणी समस्या कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील