कालिदास देशमुख यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:24 IST2018-12-02T01:24:25+5:302018-12-02T01:24:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदलापूर शहर अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून अध्यक्षपदी कालिदास देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

Kalidas Deshmukh re-elected as NCP's president | कालिदास देशमुख यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड

कालिदास देशमुख यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड

बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदलापूर शहर अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून अध्यक्षपदी कालिदास देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी नियुक्तीचे पत्र देशमुख यांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदी कुणाची निवड होईल याकडे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे लक्ष होते. मागील दोन महिन्यांपासून ही निवड अपेक्षित होती. देशमुख आणि गटनेते आशिष देशमुख गटात वाद असल्याने ही निवड रखडल्याची चर्चा शहरात होत होती. गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे स्वत: या भागात आले असता त्यांना याबाबत विचारले असता बदलापूर शहराच्या अध्यक्षपदाची निवड लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. ठाणे जिल्ह्याध्यक्ष तिवरे यांचे हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच देशमुख यांना देण्यात आले. प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव, गोटीराम पवार, आशिष दामले उपस्थित होते.

Web Title: Kalidas Deshmukh re-elected as NCP's president