शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणची ठाण्यातून पुन्हा रायपूर कारागृहात रवानगी

By जितेंद्र कालेकर | Updated: January 21, 2022 17:23 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

ठळक मुद्देपोलीस कोठडीची मागणी फेटाळलीराजकीय हेतूने अटक झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे त्याला पुन्हा रायपूरच्या कारागृहात ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या न्यायाधीश एस. व्ही. पाटील -मेटील यांनी शुक्रवारी दिले.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण बाबाविरुद्ध २९ डिसेंबर २०२१ रोजी २९४, २९५, २९८ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रायपूर येथील धर्मसंसदेमध्ये कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. या टीकेने त्याने देशवासियांचाही अवमान केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गोडसेचे समर्थन करताना वाटेत येणाºयाना कापून टाकण्याची धमकीही पुण्यात दिल्याचा आरोप होता. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील यांच्या पथकाने रायपूर न्यायालयाच्या मार्फतीने रायपूर कारागृहातून १९ जानेवारी २०२२ रोजी कालीचरण याला ताब्यात घेतले. त्याला २१ जानेवारी रोजी ठाणे न्यायालयात हजर केले..................ठाण्यात गुन्हाच घडला नाही...नौपाडयात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे न्यायालयाचे अटक वारंट जरी नौपाडा पोलिसांनी आणले तरी संबंधित गुन्हा ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडला नसल्याचे कालीचरणचे वकील पप्पू मोरवाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यातील फिर्यादी हे राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच राष्टÑवादीचे नेते असल्यामुळे हा गुन्हा पोलिसांवर दबाव आणून राजकीय हेतूने नौपाडयात दाखल केल्याचेही अ‍ॅड. मोरवाळे म्हणाले. त्याचवेळी कालीचरण यांच्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीसाठी नौपाडा पोलिसांनी आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर संबंधित वक्त व्य हे रायपूर आणि पुण्यात केले. संबंधित ठिकाणी आरोपीला पोलीस कोठडी मिळाली होती. आरोपीकडून काहीही हस्तगत करायचे नाही. पुण्यात तर ते जामीनावर सुटले आहेत. रायपूरमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली. सर्व मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली.----------------------------कडक बंदोबस्तामध्ये पुन्हा रायपूरमध्ये-ठाण्यातील अवघ्या अर्ध्या तासांच्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी पुन्हा कालीचरण याला कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस व्हॅनमधूनच रायपूर कारागृहात पुन्हा नेले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र