शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवरून सेना-भाजपमध्ये कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:16 IST

Thane News : बुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक)दरम्यान उभारलेल्या उड्डाणपुलावरून अखेर दुतर्फा वाहतुकीला सुरुवात झाली आहे. ती सुरू करण्यावरूनही शिवेसना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

ठाणे - बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक)दरम्यान उभारलेल्या उड्डाणपुलावरून अखेर दुतर्फा वाहतुकीला सुरुवात झाली आहे. ती सुरू करण्यावरूनही शिवेसना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. हा उड्डाणपूल आमच्यामुळेच खुला झाला, असा दावा दोहोंनी केला आहे. दीड वर्षांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये लुटुपुटुची श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.शहरातील एकाही कामाचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठीची रणनीतीच शिवसेनेने आखली आहे. त्यात सध्या तरी काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे.  जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला. याचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठी शिवेसनेने आधीच बॅनरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस भाजपनेही हे श्रेय आपलेच असल्याचे सांगून शिवसेनेने हा प्रस्ताव रोखून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, ठणे शहराला पाण्याचा प्रश्न सतावत होता. वाढीव १० एमएलडी पाणी मिळावे, म्हणून प्रयत्न सुरू होते. भाजपच्या नगरसेवकाने यासाठी पत्रव्यवहारही केला होता, परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत बैठक घेऊन स्टेमच्या अधिकाऱ्यांना खडसावून १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आश्वासन मिळविले. यावरूनही महापौर विरुद्ध भाजप नगरसेवक यांच्यातील श्रेयासाठीची चढाओढ ठाणेकरांनी पाहिली. पूल सुरू होताच श्रेय आता बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक)दरम्यान उभारलेल्या उड्डाणपुलावरून वाहतुकीत सुरुवात केली आहे. यावरून शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून आधीच श्रेय घेऊन टाकले, परंतु मंगळवारी सायंकाळी उशिरा भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून हे आमच्यामुळेच झाले असल्याचा दावा केल. एकूणच भाजप आणि शिवसेनेते श्रेयवादावरून जो काही सामना रंगू लागला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा