शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

कळव्यातील घटना : आरोपींवरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 22:02 IST

 जितेंद्र कालेकर ठाणे, दि. 25 -  कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या महिलेने बलात्काराचा बनाव केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.रविवारी सायंकाळी झालेली ही कथित सामूहिक बलात्काराची घटना हा ...

 जितेंद्र कालेकर ठाणे, दि. 25 -  कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या महिलेने बलात्काराचा बनाव केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.रविवारी सायंकाळी झालेली ही कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले. या महिलेचे पती व्यंकटेश यांनी दीड वर्षापूर्वी कर्नाटकातील शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्याला अटकही झाल्यामुुळे तो कारागृहात होता. त्याची दोनच महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली. शिरसप्पा व त्याचे साथीदार आपल्याला नव्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती व्यंकटेश याने पत्नीकडे बोलून दाखवली होती. आपले वडील व आई यांचे संभाषण त्यांच्या मुलीने ऐकले होते. त्यामुळे तिने बलात्काराचा बनाव करण्याची युक्ती आईला सुचवली होती.शिरसप्पा व त्याच्या पाच साथीदारांनी आपल्यावर बलात्कार केला आणि आपल्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप त्या महिलेने केला. मात्र तिच्या शरीरावरील अ‍ॅसिडची एक जखम सोडता अन्यत्र पोलिसांना कुठेही अ‍ॅसिड सापडले नाही. तसेच बलात्कार करणाºयांची नावे सांगताना तिची मुलगी आणि मुलगा यांच्या जबाबामध्ये विसंगती आढळली. ज्यांनी बलात्कार केला असे सांगितले ते तेलंगणामध्ये असल्याचे निष्पन्न झाले व इतक्या कमी कालावधीत तेथे पोहोचणे अशक्य होते. वैद्यकीय तपासणी बलात्काराचे पुरावे नाहीबलात्काराचा आरोप करणाऱ्या या महिलेच्या वैद्यकीय तपासणीमध्येही शरीर संबंधाबाबतच्या खुणा आढळलेल्या नाहीत.  त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांना वैद्यकीय अहवालाची जोड लाभली आहे. तिघांचे जबाब नोंदविणार कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांचे एक पथक तेलंगणातील तीन कथित आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी गेले आहे. त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर इतर सर्व बाजूंची पडताळणी करुन बलात्काराचा गुन्हाच रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही एका वरीष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.