कलानींच्या हाती घड्याळच, शेकडो इच्छुकांचे अर्ज

By Admin | Updated: November 14, 2016 04:13 IST2016-11-14T04:13:14+5:302016-11-14T04:13:14+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ फेकून देऊन भाजपाचे कमळ हाती घ्यायला निघालेल्या वादग्रस्त ओमी कलानी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात दोन तट

Kalani's hand clock, hundreds of wishes | कलानींच्या हाती घड्याळच, शेकडो इच्छुकांचे अर्ज

कलानींच्या हाती घड्याळच, शेकडो इच्छुकांचे अर्ज

सदानंद नाईक / उल्हासनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ फेकून देऊन भाजपाचे कमळ हाती घ्यायला निघालेल्या वादग्रस्त ओमी कलानी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात दोन तट पडल्याने आता राष्ट्रवादीतर्फेच निवडणूक लढवण्याचे त्यांनी ठरवले आहे. कलानी यांच्याकडे इच्छुकांचे ५०० पेक्षा जास्त अर्ज आले असून ३०० अर्ज आॅनलाइन आल्याची माहिती गटनेते मनोज लासी यांनी दिली.
भाजपाने कलानी यांना पक्षप्रवेशाचे गाजर दाखवले होते. पप्पू कलानी यांच्याविरोधात एकेकाळी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला होता. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाचे पानिपत करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन कलानी यांनी कोअर कमिटीत केले आहे. पप्पू यांचे जुने कट्टर समर्थक ओमी यांच्यामागे उभे आहेत. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांच्यासह पक्ष नेतृत्वाने उमेदवार निवडीचे सर्वाधिकार ओमी व त्यांच्या मातोश्री ज्योती यांना दिले आहेत.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या १० वर्षांपासून भाजपा-शिवसेनेसह रिपाइं, साई पक्षाची सत्ता पालिकेवर आहे. मात्र, १० वर्षांत एकही योजना पूर्ण झाली नसून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Kalani's hand clock, hundreds of wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.