शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

अवघ्या ६ महिन्यात मीरा भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्याची स्वगृही बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 13:36 IST

बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात  तब्बल २५  वर्षां पेक्षा जास्त काळ एकाच विभागात ठाण  मांडून असणारे वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची जानेवारीत पाणी पुरवठा विभागात झालेली बदली आता रद्द करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यात खांबीत यांची स्वगृही झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेले सुरेश वाकोडे यांना बांधकाम विभागात खांबित यांच्या जागी नेमण्यात आले आहे. मीरा भाईंदर नगरपरिषद असताना पासून कार्यरत दीपक खांबित हे महापालिकेतील अतिशय वजनदार अधिकारी मानले जातात. नगरसेवक, राजकारणी पासून अनेकांवर त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या विरोधात सहसा कोणी ब्र काढत नाहीत. परंतु जानेवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त डॉ विजय राठोड यांनी धाडसी निर्णय घेत खांबीत यांची बदली पाणी पुरवठा विभागात केली होती. 

पाणी पुरवठा विभागात २०११ साला पासून ठाण मांडून असणारे सुरेश वाकोडे यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली होती. परंतु राठोड यांची बदली होऊन आयुक्त पदी दिलीप ढोले यांची नियुक्ती झाली. ढोले यांनी मंगळवार २७ जुलै रोजी आदेश काढून खांबीत यांची पुन्हा बांधकाम विभागात तर वाकोडे यांची पुन्हा पाणी पुरवठा विभागात बदली केली आहे. अवघ्या सहा महिन्यात खांबीत यांची पुन्हा स्वगृही झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे खांबीत यांच्या दबदब्याची प्रचिती आल्याचे मानले जाते. 

या आधी पालकमंत्री असताना गणेश नाईक यांनी  खांबीत यांच्या बदलीचे आदेश दिले होते . त्यावेळी त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली गेली.  परंतु खांबित त्या विभागात हजरच झाले नाहीत . उलट काही दिवसातच त्यांनी बदली रद्द करून नाईक यांच्या नाकावर टिच्चून बांधकाम विभाग मिळवला . २००८ साली नगरसेवक चंद्रकांत वैती यांनी खांबित विरोधात आघाडी उघडली व सेवेतून निलंबित करण्याचा ठराव केला होता . ठराव मंजूर झाला . परंतु नंतर पुढच्या सभेत काही नगरसेवकांनी खांबित यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव केला होता . 

आयुक्तांनी खांवीत व वाकोडे यांची त्यांच्या संस्थानिक विभागात पुन्हा बदली करतानाच तब्बल १५ वर्षां पेक्षा जास्त सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळणारे उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे यांना दणका दिल्याचे मानले जाते. पानपट्टेयांच्या कडून सार्वजनिक आरोग्य विभाग काढून घेत तो उपायुक्त अजित मुठे यांच्या कडे दिला आहे.  तर पानपट्टे यांच्या हाती परिवहन विभागाचे स्टेअरिंग  देण्यात आले आहे. तर  मुठे यांच्याकडून अतिक्रमण विभाग काढून घेत नवनियुक्त उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या कडे सोपवला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक