शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर कनिष्ठ अभियंता गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:31 IST

नवी मुंबईच्या कोपरखेैरणे येथील एका हॉटेलसाठी साउंडप्रूफचे प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता विनोद गंभीरे (३५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे७० हजारांची लाच स्वीकारलीठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलबांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावरच केली अटक

ठाणे : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता विनोद गंभीरे (३५) याला ७० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. नवी मुंबईतील एका हॉटेलचालकाला साउंडप्रूफचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने लाच घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका हॉटेलसाठी साउंडप्रूफच्या प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी या हॉटेलचालकाने ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग क्रमांक-३ चा कनिष्ठ अभियंता गंभीरे याच्याशी संपर्क साधला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गंभीरे याने त्यांच्याकडे ८० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजारांची रक्कम देण्याचे ठरले. सौदा पक्का झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड यांच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी सापळा लावून याबाबतची पडताळणी केली. तेव्हा दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावरच ७० हजारांची रक्कम स्वीकारताना गंभीरेला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग