ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली एकपात्री अभिनयाची जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 16:56 IST2019-11-04T16:53:49+5:302019-11-04T16:56:26+5:30
अभिनय कट्टा म्हणजे नवोदित कलाकारांच्या कलागुणांना असणार हक्काचं व्यासपीठ.

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली एकपात्री अभिनयाची जुगलबंदी
ठाणे : अभिनय कट्टा ४५३ ठरला एकपात्री अभिनयाच्या जुगलबंदीचा रविवार. कलाकारामधील आत्मविश्वास वाढावा आणि रंगमंचावरील त्यांचा वावर सहजसुलभ व्हावा म्हणून एकपात्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे.म्हणूनच अभिनय कट्ट्यावर अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी एकपात्रीच्या जुगलबंदीचे आयोजन केले होते.
अभिनय कट्ट्याची सुरुवात अभिनय कट्ट्याच्या कलाकार शुभांगी भालेकर ह्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.सुरुवातीलाच अभिनय कट्ट्याचा कलाकार अभय पवार ह्याने 'कलाकार' ही हिंदी एकपात्री सादर केली. त्यानंतर शुभांगी भालेकर ह्यांनी 'चाळीसाव वरीस धोक्याचं' ह्या एकपात्रीचे सादरीकरण केले.न्यूतन लंके हिने 'तुझं आहे तुजपाशी' नाटकातील एक प्रवेश सादर केला.परेश दळवी ह्याने 'विचार' ह्या एकपात्रीचे सादरीकरण केले.साक्षी महाडिक हिने सादर केलेली 'मुल्क' ही एकपात्री सादर करून हिंदू मुसलमान संबंधावर विचार करायला तर रोहिणी थोरात हिने 'खाना सुजलाना' ह्या एकपात्रीचे लोटपोट हसविले.सहदेव साळकर ह्याने '१९ फेब्रुवारी २०१९' ही एकतर्फी प्रेमाची अबोल व्यथा सादर केली तर कदिर शेख ह्याने एक भन्नाट आपातकलीन 'पायलट' ची व्यथा विनोदी रित्या सादर केली.अभिषेक जाधव ह्याने सादर केलेलं 'गांगुर्डे' नावच प्रवासवर्णन प्रेक्षकांना मनापासून हसवून गेलं* संपूर्ण कार्यक्रमच निवेदन अभिनय कट्ट्याचा कलाकार आदित्य नाकती ह्याने केले. अभिनय कट्ट्याचा कलाकार हा सर्वगुणसंपन्न असावा भविष्यात तो प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांच्यातील प्रत्येक गुण विकसित असावा हा प्रयत्न अभिनय कट्ट्याचा असतो. कलाकार एकपात्री करताना त्याचा आत्मविश्वास वाढतो त्यासाठीच ही जुगलबंदी आयोजित करण्यात आली होती असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.