सापगाव नदीवरील प्रवास झाला धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST2021-09-26T04:43:53+5:302021-09-26T04:43:53+5:30
भातसानगर : भातसा नदीवरील सापगाव नदीवरील पुलाचे रेलिंग तुटल्याने भयावह स्थिती झाली आहे. सापगावच्या पुलाचे कठडे, रेलिंग तुटल्याने कधीही ...

सापगाव नदीवरील प्रवास झाला धोक्याचा
भातसानगर : भातसा नदीवरील सापगाव नदीवरील पुलाचे रेलिंग तुटल्याने भयावह स्थिती झाली आहे. सापगावच्या पुलाचे कठडे, रेलिंग तुटल्याने कधीही अपघात घडू शकतो. वर्षभर या पुलाखालून भातसा धरणाचे पाणी मुंबईला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने वाहत असते. त्यातच शहापूर, मुरबाड, शेणवे, डोळखांब या मार्गावरील दिवसरात्र वाहतूक या मार्गावरून चालू असते. एकदम दोन वाहने आल्यास खड्ड्यांमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागते तर रात्रीच्या वेळी येथे कोणतीही विद्युत सुविधा, फलक नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रात्री एखादा अपघात झाल्यास ती दुर्घटना लक्षातही येण्यास वेळ लागू शकतो. ताेपर्यंत जखमींना जीवही गमवावा लागू शकताे. असे काही घडू नये यासाठी आताच काळजी घेणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.
काेट
सापगाव पुलाचे दोन्ही बाजूंच्या रेलिंगचे कठडे तुटले असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कठडे करणे गरजेचे आहे.
- अलका झवर, सामाजिक कार्यकर्त्या