शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप; नरेश म्हस्के याची टीका

By अजित मांडके | Updated: January 4, 2024 16:00 IST

आव्हाडांना सांभाळून घ्या ते आपल्यात येणार आहेत. असे उध्दव ठाकरे सांगायचे म्हस्केंचे खळबळजनक विधान.

अजित मांडके, ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची जहरी टीका करताना उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असे सांगितले जायचं असेही खळबळजनक उद्गार म्हस्के यांनी केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री आणि संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व असा टोला म्हस्के यांनी ठाण्यातील आनंदआश्रमामधून प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. याशिवाय लोकांची माथी भडकवण्याच काम करून दंगली भडकवण्याचा आव्हाडांचा कट असल्याने याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

पुढे बोलताना म्हस्के यांनी, आव्हाड रात्रीचे ट्विट करतात, आणि सकाळी ते डिलीट करतात.  रात्री त्यांची अवस्था काय असते, हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा असे म्हटले. तसेकंग नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे, कदाचित ते त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील असे म्हस्के यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो, तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, एवढा मातोश्रीला जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होत. तसेच कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही मातोश्रीला दिला होता. तरी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या असा सवाल म्हस्के यांनी करत, आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व आहे असा प्रश्न म्हस्के यांनी विचारत, खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांनी त्यांच्या आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं आणि भूमिका मांडावी असे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना, एकीकडे आव्हाड हिंदू देवतांबद्दल बोलतात आणि रात्रीचे बुवा आणि मांत्रिकांच्या मध्ये बसलेले असतात, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात आणि वेगवेगळ्या बुवा बाबांचे गंडेदोरे बांधतात ही बाब ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आव्हाडांचा कुठला आणि कसला अभ्यास, यापूर्वी ऋषी मुनींनी केलेला अभ्यास हा फेल आहे का, राज्य घटनेत सर्व जाती धर्माचा आदर करा असं म्हटलं आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानातील लोकांची माथी भडकवण्याच काम जितेंद्र आव्हाड करत आहे, दंगली भडकवण्याचा  त्यांचा कट आहे.याची सरकारने चौकशी करावी असे ही म्हटले आहे.

 तर शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील या बद्दल बोलत नसतील तर त्यांनी वक्तव्याला समर्थन दिल आहे असं मानतो असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड