शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 22:43 IST

काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे

अजित मांडके

ठाणे - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे, त्याला विरोध करत आज रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संत तू झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.   काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध सुरू झालेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दहा वाजता विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकांने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सन्ताप झालेल्या या दर्शकांनी त्यांचं ऐकलं नाही अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवल्या जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाजीप्रभू देशपांडे हा छत्रपती शिवाजी महाराजांची लढताना दाखवलेला आहे हा चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजthaneठाणेcinemaसिनेमा