शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

झाडांच्या कत्तलीसाठीच आरेमध्ये ‘पोलीसराज’ - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:15 IST

एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते.

ठाणे : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची कत्तल करता यावी, यासाठी आरेमध्ये संचारबंदी जाहीर करून हा परिसर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. त्यामुळे आरेत पोलीसराज निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला.एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या-जाणाऱ्यांची ओळखपत्रांसह तपासणी करत प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करीत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीजवळ आधार कार्ड नव्हते. त्यामुळे तिचे आदिवासी वडील आपल्या पाड्यातून तिचे आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी तिला अडकवून ठेवले होते. फरक इतकाच की, आरेमध्ये दंगल-हत्याकांड सरकारच करत होते. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबविण्यासाठी जे कोणी पुढे येतील, त्यांना अडविण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारे सरकार स्वत: पर्यावरणाचा विध्वंस करत होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.आव्हाड शनिवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास आरेमध्ये पोहोचले. तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली. आमदारकीचा तोरा मिरविण्यात अर्थ नव्हता. पोलीस ‘वरून’ आलेल्या हुकुमाला बांधिल होते. नशिबाने त्या वेळी जंगलातल्या आदिवासीपाड्यात राहणारी एक महिला त्यांच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा अन् खडा माहिती होती. पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आव्हाड यांनी जंगलात प्रवेश केला. काही अंतर दुचाकीने पार केले. जिथे झाडं कापली जात होती, तिथपर्यंतचे साधारण नऊ किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी कापले. ही वृक्षछाटणी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायची, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत आरेमध्ये प्रवेश करण्याचा एक चित्तथरारक अनुभव आपण घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.‘प्राणवायू देणारी झाडे निष्प्राण झाली’तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसले, ते हृदयद्रावक होते. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडे छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटांत ७०/८० वर्षांचे झाड भुईसपाट होत होते. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडीओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो, तेव्हा डोळ्यांत पाणी आले. मुंबई, ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वत:च निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाºयांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढल्याचे आव्हाड यांनी सांगितले.‘...तर मुंबईचे गोरखपूर होईल’नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालविल्या. आॅक्सिजनच्या अभावाने गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचे गोरखपूर करायच्या वाटेवर आहे, असे या घटनेचे वर्णन आव्हाड यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAarey Coloneyआरे