शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही- जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:28 IST

पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते,

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते, असा हल्लाबोल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. 

कळव्यातील वाघोबानगरमधील कारगिल परिसरात २० लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. येत्या महिन्याभरात या परिसरातील सर्व भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होईल, अशी ग्वाही आव्हाड यांनी यावेळी दिली.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले. वाघोबानगरवासियांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील विकास कामांकडे लक्ष देणे आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मुलभूत सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे तुमच्या घरांच्या किंमती निश्चितच वाढतील, परंतू आपली घरे विकून पुन्हा दूसरीकडे झोपडया बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्याकडे येत्या महिनाभरात पाणी येईल, फक्त आशिर्वादाचा हात असू द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

केवळ विकासाचे काममते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणोरडे राजकारण आपण कधीच केले नाही. परंतू, असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. पाण्याचे वॉल्व बंद करुन आणि शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण कधीच केले नाही. लोक घाबरुन मते देतीलही परंतू, त्यांचे आशिर्वाद मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता असे व्हॉल्व बंद होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेशशिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामआवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहूल सिंग, संदीप शर्मा, नितेश गौड, राहूल दुबे आणि दीपक राजभर आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

गणेश भगत यांचा विशेष सत्कारपाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस