शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:16 IST

ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता.

ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता. चर्चबरोबर, दुकाने आणि मॉलही सजले होते. हे सेलिब्रेशन अजून दहा दिवस अशाच उत्साहात सुरू राहणार आहे. नाताळच्या शुभेच्छा, नाताळ गोठ्यांची सजावट, केक-चॉकलेटची लयलूट, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तू, गिटारच्या साथीने रात्रभर सुरू असलेले खाणे-पिणे आणि गाणेबजावणे अशा वातावरणात नाताळचा उत्साह द्विगुणित होत गेला.जेथे जेथे सांताक्लॉज उपस्थित आहे, तेथे त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून चॉकलेट घेण्यासाठी चिमुकल्यांची गर्र्दी झाली होती. ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’सारखी गाणीही ऐकायला मिळत होती. खास नाताळनिमित्त बसवलेली गाणी, प्रार्थना, बायबलमधील उताºयांचे वाचन, नाताळचे संदेश यामुळे वातावरणाला वेगळेच धार्मिकतेचे वलय लाभले होते.नाताळचे वेध लागले की ख्रिस्ती कुटुंबात घरी सजावट, फराळाची जोरदार तयारी सुरू होते. दोन-तीन दिवस आधीच घराघरांत आणि चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा तयार केला जातो. तसा गोठा सजविला जातो. घरातील मंडळी वेळ काढून या कामात हातभार लावतात. नाताळची पूवर्संध्याही उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. त्यातच यंदा तो दिवस रविवारचा असल्याने चर्चमध्ये गर्दी वाढली होती. प्रत्यक्ष नाताळच्या दिवशी सोमवारी सकाळी चर्चमध्ये येशूजन्माचा आनंद साजरा केला गेला. नाताळच्या शुभेच्छा दिल्या. काही चर्चतर्फे गरजूंना मदत केली गेली, असे ख्रिस्ती बांधव विश्वास उद्गीरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नाताळच्या काळात हजारो भाविक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येतात. काही चर्चमध्ये मराठी व इंग्रजीत भक्तीमार्ग सांगितला जातो. अनेक चर्चेमध्ये ११ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत ख्रिसमस कॅरल्स झाल्या. त्यात घरोघरी जाऊन येशू जन्माची सुवार्ता सांगितली गेली. ज्यांच्या घरी कॅरल्स सिंगिंग झाले नाही त्यांच्यासाठी नाताळच्या पहिल्या दिवशी सायंकाळी चर्चबाहेर वाद्यवृंदासह ती गाणी सादर झाली. ही परंपरा जपण्यासाठी दरवर्षी चर्चची तरुण मंडळी घरोघरी जातात.>डोंबिवलीतही नाताळजल्लोषमेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, भेटवस्तुंचे वाटप करत डोंबिवली-कल्याण परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरा झाला. चर्च सजवण्यात आली.कल्याणला कर्णिक रोडवरील सेंट थॉमस चर्चमध्येही येशू्च्या गोठ्याचा देखावा साकारला आहे. रात्रीपासून नेबर पार्टीला सुरुवात होणार आहे. या पार्ट्या १ जानेवारीपर्यंत चालतात. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगरच्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधव जमले. कॅरल सिंगिग झाले. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, तामिळ भाषेत देवाची गाणी सादर केली गेली.पाच हजार ख्रिस्तींनी एकत्र येत चर्चमध्ये प्रार्थना केली, अशी माहिती फादर व्हिक्टरी डालमेंट यांनी दिली. ख्रिसमसनिमित्त मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांसाठी ज्येष्ठांना घेऊन येण्याची जबाबदारी त्या विभागातील प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.>पुस्तकांचा ख्रिसमस ट्रीख्रिसमसनिमित्त वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीने टिळकनगर शाळेसमोर विविध पुस्तकांचा ख्रिसमस ट्री तयार क ेला आहे. तरूणांमध्ये आणि मुलांमध्ये वाचनांची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा ट्री उभारण्यात आला आहे.>कलकल आणि केकख्रिस्तीबहुल वस्तीत आकर्षक सजावटी होत्या. आकाशकंदिल, रंगीबेरंगी स्टार्सने परिसर सजला. खमंग फराळही तयार केला गेला. विविध केक, नानकटाईबरोबर मिल्क क्रिम, जुजुब्स, ग्वा चीज, कलकल्स, कोकोनट कॉरडियल, करंजी, रिच प्लम केक व ख्रिसमस कप केक तयार झाले. काहींनी ख्रिसमस ट्रीच्या आकाराचे स्वीट तयार केले.

टॅग्स :thaneठाणे