ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:11 IST2019-10-20T16:09:01+5:302019-10-20T16:11:18+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर
ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल..आमदार कोण?..मुख्यमंत्री कोण?..युती का आघाडी? असे अनेक प्रश्न २१ तारखेला ईव्हीएम मशीन मध्ये बंदिस्त होणार आणि २४ ला सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार.परंतु ह्या सर्व प्रश्नांची उत्तर ठरवत एक 'मत'..आपल्या सर्वांचं मत.त्या मताचं महत्व पटवून देण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ४५१ अभिनय कट्ट्यावर रंगलेला प्रयोग मतदार राजा जागा हो.
आजवर अभिनय कट्ट्यावर विविध कलाकृतीतून समाजप्रबोधन झाले. मतदान करण्याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी.मत देण्याचा अधिकार बजावून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास साधू शकतो त्यासाठी प्रत्येकाने योग्य उमेदवाराला मतदान करून तो हक्क प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे. अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना आणि आदित्य नाकती ह्यांच दिग्दर्शन असलेल्या 'मतदार राजा जागा हो...' ह्या नाट्यसादरीकरणात अभिनय कट्ट्याचे कलाकार सहदेव साळकर,महेश झिरपे,अभय पवार,रोहिणी थोरात,शुभांगी भालेकर,विद्या पवार ह्यांनी सहभाग घेतला. राज्याचा किंवा देशाचा विकास होत नाही हे बोलण्यापेक्षा आपण योग्य उमेदवार निवडून देणे आपले कर्तव्य आहे.मतदानाचा दिवस ही सार्वजनिक सुट्टी नसून आपलं कर्तव्य बजावण्याचा हक्काचा दिवस असतो, लोकशाहीचा सन्मान करण्याचा दिवस असतो.आपण सर्वांनी देखील मतदान करूया आणि एक योग्य सरकार निवडून देऊया असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या सोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेला एकाच आवाहन केले मतदार राजा जागा हो..