ठाण्यातील लग्न समारंभातून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Published: February 18, 2024 10:20 PM2024-02-18T22:20:05+5:302024-02-18T22:21:30+5:30
याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी सांगितले.
ठाणे: काही अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरटयांनी वागळे इस्टेट येथील शहनाई हॉलमधील लग्न समारंभातून तब्बल एक लाख ४७ हजारांचे दागिने लांबविल्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी सांगितले.
राबोडीतील वृंदावन सोसायटीतील रहिवासी हेमंत शिरोडकर (६४) यांच्या मुलीचा १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शहनाई हॉलमध्ये लग्न समारंभ होता. याच समारंभातून ६२ हजारांचे नेकलेस, ५० हजारांची सोनसाखळी असे दीड लाखांचे दागिने चोरटयांनी लंपास केले. या टोळीमध्ये काही लहान मुलांचाही संशय असून त्यांचा सीसीटीव्हीतील चित्रणाद्वारे शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा शोध घेण्यात येत आहे.