दोन लाखांची रक्कम वाटून घेण्याचे आमिष दाखवून दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST2021-02-26T04:56:07+5:302021-02-26T04:56:07+5:30
ठाणे : दोन लाखांची रक्कम वाटून घेण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षीय महिलेचे ४० हजारांचे सोन्याचे दागिने दोघांनी लुबाडल्याची ...

दोन लाखांची रक्कम वाटून घेण्याचे आमिष दाखवून दागिने लुबाडले
ठाणे : दोन लाखांची रक्कम वाटून घेण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षीय महिलेचे ४० हजारांचे सोन्याचे दागिने दोघांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथे राहणारी ही महिला २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास कोपरी रिक्षा स्टॅन्डजवळील रेल्वे ब्रिजवर चढत असताना तिच्याजवळ दोघे जण आले. त्यांनी तिला मध्येच थांबवून आमच्याकडे दोन लाख रुपये असून ते आपण वाटून घेऊ अशी बतावणी केली. नंतर त्यांनी हातात काहीतरी बांधलेल्या पैशाचा रुमाल देऊन नंतर फलाट क्रमांक एकच्या बाजूच्या सॅटीस पुलावर या महिलेला नेऊन तिचे दहा ग्रॅम वजनाचे २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या पट्ट्या आणि कर्णफुले असे ४० हजारांचे दागिने दिशाभूल करून लुबाडले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.