उल्हासनगरात ८ लाख ३८ हजार किमतीचे जीन्स कपडे चोरीला
By सदानंद नाईक | Updated: January 8, 2023 17:28 IST2023-01-08T17:27:38+5:302023-01-08T17:28:38+5:30
उल्हासनगरात ८ लाख ३८ हजार किमतीच्या जीन्स कपड्याची चोरी झाली आहे.

उल्हासनगरात ८ लाख ३८ हजार किमतीचे जीन्स कपडे चोरीला
उल्हासनगर: कॅम्प नं-३ सीएचएम कॉलेज परिसरातील यश इंटरप्राइजेस व जय भवानी इंटरप्राइजेसच्या दुकानातून शुक्रवारी रात्री तब्बल ८ लाख ३८ हजार किमतीचे ३३ जीन्स कपडा रोल चोरीला गेले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात यश चंदन मोटवानी यांचे यश इंटरप्राइजेस तसेच इतरांचे जय भवानी इंटरप्राइजेससह एकून तीन दुकाने आहेत. शुक्रवारी अज्ञात चोरट्यानी दुकानात प्रवेश करून जीन्स कपड्याचे ३३ रोल चोरून नेले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली असून चोरी झालेल्या जीन्स कपड्याची एकून किंमत ८ लाख ३८ हजार ६० रुपये आहे. शनिवारी चोरीची घटना उघड झाल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.