शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

माफियांवर धडक... उद्यान व रस्ते आरक्षणातील ३०० अतिक्रमणांवर जेसीबी फिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 17:26 IST

पालिका जागेवर अतिक्रमण करणाऱ्यां मध्ये भूमाफिया मनोज चव्हाण, गुलाम गौस शेख उर्फ कालिया बाबू आदींची नावे आली होती.

ठळक मुद्दे पालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी येथील सुमारे ३०० बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान व रस्ता आरक्षणात झालेल्या सुमारे ३०० पक्क्या व कच्च्या बेकायदा बांधकामांवर अखेर शुक्रवारी  महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली. महापौर ज्योत्सना हसनाळे यांचा प्रभाग असलेल्या काशीमीरा भागात रस्ता व उद्यानाच्या आरक्षण क्रमांक ३६४ या तब्बल ६३ गुंठे इतक्या पालिका मालकीच्या जागेत भूमाफियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे, चाळी व मोठे शेड आदी कामे केली होती . माफियांनी पालिका जागेत बेकायदा बांधकामे करून त्याची विक्री चालवली होती. 

सदर अनधिकृत बांधकामे तोडून आरक्षण ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने धरणे उपशहरप्रमुख रामभवन शर्मा यांनी धरणे आंदोलन केले. पालिका जागेत बेकायदा बांधकामे करून त्याची विक्री करून भूमाफिया लोकांची फसवणूक करत असल्याने सदर बेकायदा बांधकामे पाडून माफियांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शर्मा हे सतत पाठपुरावा करत होते. प्रभागात भाजपाचे चार नगरसेवक व त्यातही महापौरांच्या प्रभागात झालेल्या ह्या बेकायदा बांधकाम ना त्यांचाच वरदहस्त असल्याचा आरोप शर्मा यांनी चालवला होता. या बेकायदा बांधकामवर मध्यंतरी पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता माफियांनी दगडफेक करून पालिका पथकावर हल्ला चढवला होता. 

पालिका जागेवर अतिक्रमण करणाऱ्यां मध्ये भूमाफिया मनोज चव्हाण, गुलाम गौस शेख उर्फ कालिया बाबू आदींची नावे आली होती. पालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी येथील सुमारे ३०० बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. जागा मोकळी करून तेथे पालिकेचा फलक लावण्यात आला आहे. कारवाई साठी, ६३ कामगार, २ पोकलेन मशीन व ४ जेसीबी वापरण्यात आले.

प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले. पोलीस उपायुक्त अमित काळे, काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पालिका उपायुक्त स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सर्व प्रभाग अधिकारी,  पोलीस निरीक्षक माणिक पाटील व पालिका -  पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :MumbaiमुंबईMira Bhayanderमीरा-भाईंदरMuncipal Corporationनगर पालिका