चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:12 IST2018-12-11T00:11:42+5:302018-12-11T00:12:00+5:30

चारित्र्याच्या संशयातून जयश्री मोजाड (२३) हिची डोक्यात सिलिंडर घालून हत्या केल्याप्रकरणी प्रियकर जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली.

Jayashree's slaying murder in character of character | चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या

चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या

डोंबिवली : चारित्र्याच्या संशयातून जयश्री मोजाड (२३) हिची डोक्यात सिलिंडर घालून हत्या केल्याप्रकरणी प्रियकर जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली.

पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या जयश्रीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने जयश्री त्याच्यापासून विभक्त झाली. त्यानंतर दीड वर्षापासून जयश्री गोळवली येथे जितेंद्र याच्यासोबत राहत होती. मात्र, तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते. आठवड्यापूर्वीदेखील दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने तिला मारहाण केल्याने तिने पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी समज देऊन त्याला सोडून दिले.

दरम्यान, जयश्री राहत असलेल्या रूममधून दुर्गंधी येत असल्याचे रहिवाशांनी मानपाडा पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी घर उघडले असता तिचा मृतदेह आढळला. जयश्रीच्या आईने जितेंद्रवर संशय व्यक्त केला होता. त्या दिशेने तपास करत जितेंद्र याला भुसावळ येथून ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत म्हणाले. तपासात त्याने तिच्या डोक्यात व चेहºयावर सिलिंडर मारून हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Jayashree's slaying murder in character of character