जावयाने सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: February 27, 2016 02:37 IST2016-02-27T02:37:42+5:302016-02-27T02:37:42+5:30

माहेरी आलेल्या आपल्या पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या कारणास्तव विजय आस्वाद (३०) या जावयाने सासरे रामचंद्र जाधव यांच्यावर रॉडने खुनी हल्ला करून मेहुणा रवी याला

Jawey's fierce assault on his father-in-law | जावयाने सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

जावयाने सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

ठाणे : माहेरी आलेल्या आपल्या पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या कारणास्तव विजय आस्वाद (३०) या जावयाने सासरे रामचंद्र जाधव यांच्यावर रॉडने खुनी हल्ला करून मेहुणा रवी याला चावा घेतल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यानंतर जावयालाही मारहाण झाली आहे.
ऊर्मिला (२८) आणि विजयचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांच्यात वाद होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वागळे इस्टेट येथील आंबेवाडी येथील घरी वास्तव्याला होती.
२५ फेब्रुवारी रोजी त्याने अचानक सासऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. तर, मेहुणा रवी याला चावा घेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. नंतर, स्वत:ही अंगावर चाकूने वार करून तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्याला जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Jawey's fierce assault on his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.