जावसईचा ओसाड डोंगर आता होणार हिरवागार!
By Admin | Updated: April 24, 2017 23:56 IST2017-04-24T23:56:56+5:302017-04-24T23:56:56+5:30
गेल्या वर्षी जावसई येथील डोंगरावर वन विभागाने मोठी मोहीम हाती घेत तब्बल ५३ हजार ७०० वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांचे

जावसईचा ओसाड डोंगर आता होणार हिरवागार!
पंकज पाटील / अंबरनाथ
गेल्या वर्षी जावसई येथील डोंगरावर वन विभागाने मोठी मोहीम हाती घेत तब्बल ५३ हजार ७०० वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांचे संवर्धन वन विभागाने केले असून ९० टक्के वृक्ष जगवण्यात त्यांना यश आले आहे. यंदा उन्हाळ्यातही हे वृक्ष तग धरून असल्याने पावसाळ्यात या वृक्षांची चांगली वाढ होईल. यामुळे पावसाळ्यात संपूर्ण डोंगरहिरवागार होणार आहे.
अंबरनाथ तालुक्याच्या एका टोकाला असलेले जावसई गाव नेहमीच पाणीसमस्येसाठी प्रसिद्ध होते. मात्र, आता या गावाने वनसंपदा संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. या गावाला लागून असलेला परिसर ओसाड होता. तेथे वनसंपदा निर्माण करण्याचे काम वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी हाती घेतले. पहिल्या पावसात त्यांनी तब्बल ५३ हजार ७०० वृक्ष या डोंगरावर लावण्याचे लक्ष्य हाती घेतले. त्यासाठी पावसाच्या आधीच या डोंगरावर खड्डे खोदले. वृक्ष लागवड झाल्यावर जनावरे त्या वृक्षांचे नुकसान करतात, हे लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठा नाला खोदण्यात आला. त्यामुळे वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी या जनावरांना जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यानंतर, १ जुलैपासून या वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली.
उन्हाळ्यात पाणी जरी मिळाले नाही, तरी ते वृक्ष तग धरून राहतील, अशाच जातींच्या वृक्षांची निवड करून या ठिकाणी त्याचे वृक्षारोपण करण्यात आले.