शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यासाठी झिंगूबाईंची वाटचाल, न्यूयॉर्कमधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:09 IST

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन  पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांना सन्मानित केले.

ठाणे -  चूल-मूल हेच पाहू नका गं..गुलामीत राहू नका…, पुरूषाप्रमाणे स्त्री समान गं… रत्न हिऱ्यांची ती आहे खान…अशा काव्यपंक्तीतून स्त्रीयांचे भूषण् असल्याचे ठामपण् सांगत आजही समाजात स्त्री पुरूष समानता आणखी रूजली पाहिजे.  तिचे हक्क मिळाले पाहिजे, समाजातून वृद्धाश्रम कमी झाली पाहिजे असे मत स्त्री उद्धारासाठी आणि समाजसेवेसाठी झटणाऱ्या झिंगुबाई बोलके यांनी मांडले .त्यांच्या  कार्याची दखल घेत  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन  पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांना सन्मानित केले. अमेरिकेहून आल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या वतीने सन्मानित केले.

बार्शीटाकळी तालुक्यातील  टिटवा या गावात नामदेव आण् पंचफुला या तायडे दाम्पत्याच्या पोटी १ जुलै १९५५ रोजी जन्माला आलेलया व जन्म:च पायाने अपंग असणाऱ्या झिंगूबाईंना आर्थिक परिस्थितीमुळे ४ थीपर्यंत शिक्षण् झाले. निंदण् खुरपण् करून त्या आईवडिलांना मदत करू लागल्या. वडील कविता करायचे तोच छंद म्हणून आत्मसात केला. समाजातील प्रश्न त्या कवितेतून मांडू लागल्या. एक पायाने अपंग असल्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत विवाह झाल्याचे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भगवान गौतम बुद्ध् आणि गाडगेबाबांवरील पुस्तके वाचून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.

साक्षरता आणि व्यसनमुक्तीवर गावागावांत प्रबोधन केले. ‘स्वामिनी’ अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणे, पुण्याच्या मासूम संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षण् घेतले, महिलांचे ५०० बचतगट,अंध, अपंग, कुष्ठरोगी, विधवा, परित्यक्ता महिलांना अनुदान मिळवून देणे असे कार्य केले. दिल्लीच्या महिला संसदेत अकोला जिल्ह्याची प्रतिनिधी म्हणून शेतकरी आत्महत्या, विधवा, स्त्री-पुरूष समानता, भ्रणहत्या, हुंडाप्रथाविरोध्, अपंगांना न्याय या विषयावर परखड मत मांडले. महिलांनी चूल आणि मूल या चौकटीत अडकून न पडता त्या साक्षर बनाव्यात यासाठी त्यांनी समाजाचा मोठा रोष पत्करत आपलं घर गमवावं लागले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत न्यूयॉर्क मधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या ज्येष्ठ समाजसेविका झिंगुबाई बोलके यांचा शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सून राजश्री बोलके, मुलगा प्रदीप बोलके, समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव, संतोष् साळुंख्, महेश विनेरकर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या