Jammu thieves arrested in Mumbai | जम्मूतील चोरट्यांना मुंब्य्रात अटक

जम्मूतील चोरट्यांना मुंब्य्रात अटक

मुंब्रा : जम्मूमधील वरुण सिंगला (रा.घर नंबर १,सेक्टर नंबर १,त्रिकुटानगर) या व्यावसायिकाला अग्निशस्त्राचा धाक दाखवून त्याच्या घरात चोरी करून मुंब्य्रात दबा धरून बसलेल्या दोघांना स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ३० जानेवारीला चोरी करून दोघे कानपूर मार्गे मुंब्य्रात पोहचून सध्या येथे राहत होते.

जम्मू पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, त्याआधारे ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहआयुक्त सुरेश मेखला तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी मोईनउद्दीन शेख (वय १९) आणि शाहअलम अन्सारी (वय ३१) यांना अमृतनगर परिसरातील दर्गारोड येथून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी जम्मूमधील व्यापाऱ्यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Jammu thieves arrested in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.