विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहण्यासाठी जळगावचे नगरसेवक अंबरनाथमध्ये
By पंकज पाटील | Updated: March 25, 2023 15:24 IST2023-03-25T15:24:20+5:302023-03-25T15:24:29+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जळगाव महापालिकेचे नगरसेवक अंबरनाथमध्ये आले होते. विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहून जळगावचे ...

विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहण्यासाठी जळगावचे नगरसेवक अंबरनाथमध्ये
अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जळगाव महापालिकेचे नगरसेवक अंबरनाथमध्ये आले होते. विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहून जळगावचे नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी देखील स्तुती केली आहे.
गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहरात झपाट्याने सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी आणि प्रकल्प कशा पद्धतीने पूर्णत्वास नेण्यात आले याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जळगाव महापालिकेचे नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी अंबरनाथमध्ये आले होते. अंबरनाथमध्ये झालेली नवीन नगरपालिकेची इमारत, नाट्यगृह, चिंचपाडा येथील ग्रंथालय, फॉरेस्ट नाका येथे न्यायालय, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, फायर ब्रिगेड इमारत, भास्करनगरचा ग्रंथालय, एमपीएसी भवन, स्टेडियम, शूटिंग रेंज आणि मुख्य म्हणजे अंबरनाथ मधील सीमेंट कोंक्रेटचे रस्ते तसेच लोकनगरी बायपास येथील रस्ते अश्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच नव्याने उभारण्यात येणारा सॅटिस प्रकल्प याची देखील माहिती घेतली.
यासोबतच प्राचीन शिव मंदिरासाठी शासनाने जो निधी मंजूर केला आहे त्या निधी अंतर्गत जी कामे होणार आहेत त्याची माहिती देखील प्रेझेंटेशनच्या माध्यमातून घेण्यात आली. अंबरनाथ शहरात मेडिकल कॉलेज सह दोन अद्यावत सर्व सुविधायुक्त असे रुग्णालय देखील उभारले जाणार असून त्या प्रकल्पाची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी नगरसेवकांना दिली. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे नगरसेवक या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. या नगरसेवकाणी प्रत्यक्ष कामांची देखील पाहणी केली. अंबरनाथच्या विकासाचा पॅटर्न जळगावमध्ये देखील राबवणार असल्याचे यावेळी नगरसेवकांनी मत व्यक्त केले.