धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जेलभरो
By Admin | Updated: September 14, 2015 03:56 IST2015-09-14T03:56:23+5:302015-09-14T03:56:23+5:30
धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा

धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जेलभरो
कल्याण : धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा, चाररस्ता येथे जेलभरो आंदोलन छेडले. धोकादायक इमारतींसाठी गृहनिर्माण योजना, सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे भाडेवसुली रोखणे, महापालिकांच्या रुग्णालयांची अवस्था सुधारणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात रस्त्यावर ठिय्या मांडला गेल्याने वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आंदोलनकर्त्यांना रामनगर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. इतर शहरांप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.
याबाबत, वारंवार विनंती अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. १ डिसेंबर २०१४ आणि २१ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही याकडे लक्ष वेधले होते. यावर तातडीने तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ठोस कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)