बालकल्याण समितीवर मनसेकडून जाधव
By Admin | Updated: March 27, 2017 05:40 IST2017-03-27T05:40:22+5:302017-03-27T05:40:22+5:30
गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने महिला बालकल्याण समितीच्या निवडीवेळी

बालकल्याण समितीवर मनसेकडून जाधव
कल्याण : गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने महिला बालकल्याण समितीच्या निवडीवेळी सदस्याचे नाव दिले नव्हते. त्यामुळे मनसेच्या कोट्यातील पद रिक्त होते. अखेर, या पदावर अपेक्षा जाधव यांची वर्णी लागली असून सोमवारच्या महासभेत याची अधिकृत घोषणा होणार आहे.
महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी १ सदस्याचा समावेश आहे. २६ डिसेंबरला केडीएमसीच्या विशेष महासभेत महिला बालकल्याणची नवीन समिती स्थापन झाली. या वेळी गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करीत मनसेच्या वतीने सदस्याचे नाव न दिल्याने महापौर राजेंद्र देवळेकरांकडून १० जणांच्याच नावाची घोषणा झाली. त्यामुळे एक जागा रिक्त होती. नुकतीच समितीच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. यात भाजपाच्या वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, ज्या गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने आपल्या सदस्याचे नाव दिले नव्हते, तो विषय अद्यापही प्रलंबितच राहिला आहे. प्रशासनाने याबाबत सरकारकडे अभिप्राय मागितला आहे. (प्रतिनिधी)