शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे ही दुर्दैवाची बाब! गिरीश ओक यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:00 IST

Traffic News : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे.

ठाणे - वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहतूक नियम स्वतःहून पाळतो, पण आपल्या देशात मात्र नियमांकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करून नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो, हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीश ओक यांनी व्यक्त केली.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमानिमित्त महिला पुरुष बाइकरॅलीचे आयोजन केले होत. त्यावेळी बोलताना डॉ.गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे, यावर भाष्य केले. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून ते स्वत: सामील झाले होते. शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्ट नाका, तलावपाळी, तीनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेटमार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने पार केला.२०० दुचाकीस्वारांनी घेतला सहभागरॅलीत सुमारे २०० दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठरावीक कालावधीपुरते नसून, ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत, असा संदेश या रॅलीदरम्यान दिल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीGirish oakगिरिश ओक