शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

बाधितांना मोबदल्यापासून वंचित ठेवणे गंभीर; जयंत पाटील यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:29 IST

पालघरमध्ये घेतली आढावा बैठक

पालघर : पालघर जिल्ह्यात धरणात मुबलक पाणीसाठा असून नद्या दुथडी भरून वाहत असताना जिल्ह्यातील स्थानिकांचे घसे मात्र कोरडे आहेत. सिंचन क्षेत्रही हळूहळू कमी कमी होत आहे. आदिवासींच्या जमिनीवर धरण उभे राहत असताना त्यांना पिण्यासाठी वणवण करावी लागते. यामुळे स्थानिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्रथम करून उर्वरित पाणी इतरांना द्यावे अशा सूचना करून बाधितांना मोबदल्यापासून वंचित ठेवणे गंभीर असल्याच्या कानपिचक्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी पालघरमध्ये अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी आढावा बैठक झाली. खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, बांधकाम सभापती शीतल धोडी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संदीप पवार, संजीव जाधवर आदी उपस्थित होते.सूर्या प्रकल्पात डहाणू आणि पालघर तालुक्यातील आदिवासींना व अन्य शेतकऱ्यांना जमिनी सिंचनाखाली आल्यास त्यांची भरभराट होईल, अशी आशा दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली न आणता त्यांच्या हक्काचे पाणी वसई-विरार आणि मीरा-भाईंदरला दिले. या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने अनेक आंदोलने पालघरमध्ये केली. त्यानंतर त्याची दखल राज्यपालांसह विधिमंडळ सभागृहाने घेऊन ३६ हजार ७४० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल, अशी ग्वाही दिली. मात्र जलसंपदा विभागाने पुढे त्याची अंमलबजावणी होईल या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची बाब संघर्ष समितीचे रमाकांत पाटील यांनी पाटीलांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पाटील यांनी कानपिचक्या दिल्या.मोखाडा तालुक्यातील लघु प्रकल्प खोलसा पाडा उभारणीसाठी कलम ३६ शिथिल केल्यास धरण उभे राहण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे खा. गावित यांनी निदर्शनास आणून दिले.  निकृष्ट दर्जाची कामे आंध्रप्रदेशातील शेट्टी नावाचा ठेकेदार करीत असल्याचे सांगून उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली. लोकांच्या जमिनी घेऊन त्यावर कालवे उभारता  आणि त्यांचे पैसे देण्यासाठी ३६ वर्षांचा कालावधी लागतो, हे फार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांचे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बोईसर औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करताना वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाण्यावर दंड आकारला जात असून त्याचा भूर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागत असल्याबाबत यावर उपाययोजना आखण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिले. पालघर नगरपालिका ना नफा ना तोटा या तत्त्वावर २६ गावे नळपाणीपुरवठा योजना चालवीत असून भविष्यात वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कमारे येथे उभारण्यात येणाऱ्या योजनेतून आरक्षित कोटा मंजूर करण्याची मागणी नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील