भिवंडी महानगरपालिका ऑनलाइन महासभेत दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीचा मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 08:18 PM2020-09-25T20:18:25+5:302020-09-25T20:23:37+5:30

भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील चौधरी यांनी या महासभेत उपस्थित केला.

The issue of the crashed Jilani building was raised in the online general meeting of Bhiwandi Municipal Corporation | भिवंडी महानगरपालिका ऑनलाइन महासभेत दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीचा मुद्दा गाजला

भिवंडी महानगरपालिका ऑनलाइन महासभेत दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीचा मुद्दा गाजला

Next

नितीन पंडित  

भिवंडी - भिवंडी  महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने नव्या आठ सदस्यांची निवडी करीता विशेष महासभा ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या महासभेत पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेचा मुद्दा जास्त गाजला. भाजप नगरसेवक निलेश चौधरी यांनी शहरातील धोकादायक इमारतींमधील वास्तव्यास मनपा प्रशासनाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा दावा केला. मनपा अधिकारी फक्त नोटीस देतात मात्र इतर कारवाई व पुनर्वसनासाठी कोणतीही व्यवस्था करीत नसल्याने आज शहरात धोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत असून, भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील चौधरी यांनी या महासभेत उपस्थित केला.

या इमारत दुर्घटनेत इमारत मालक जिलानी यांच्या वर मनपा प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनी आपली चूक झाकण्यासाठी केलेले षडयंत्र असून जिलानी हे स्वतः मुस्लिम धर्मगुरू असून ते 1990 पासून उत्तर प्रदेश येथे स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मनपा प्रशासनाने आपले हात झटकले आहेत, असा आरोप देखील भाजपाचे नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला आहे. जिलानी इमारतीस बांधकाम परवानगी मनपा अस्तित्वात येण्या आधी ग्रुप ग्रामपंचायत नारपोली कामतघर असताना 25 सप्टेंबर 1975 साली देण्यात आली असल्याची माहिती चौधरी यांनी दिली असून, 1977 रोजी या इमारतीस घरनंबर मिळाले. त्यावेळी घर नंबर 1046 असे होते, मनपा अस्तित्वात आल्यानंतर या इमारतीस 69 हे घर नंबर मिळाले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक झाल्यांनतर या इमारतींमधील 54 सदनिकाधारकांना मनपाने नोटीस दिल्या होत्या. मात्र दुर्घटनेनंतर फक्त धर्मगुरू असलेल्या जिलानी यांच्या एकट्यावर कारवाई करणे चुकीचे असून मनपा अधिकाऱ्यांनी पंचनामादेखील चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा आरोप नगरसेवक चौधरी यांनी महासभेत केला आहे. विशेष म्हणजे 2008 साली या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे असेसमेंट मनपा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचेही आता समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करून चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. नगरसेवक चौधरींच्या आरोपानंतर आता ही समिती नेमकी काय अहवाल देते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महासभेत कोणार्क विकास आघाडीतर्फे विलास पाटील, भारतीय काँग्रेस पक्षातर्फे अरुण राऊत, मोहम्मद हलीम अन्सारी,आरिफ मोहम्मद हनीफ खान, प्रशांत अशोक लाड, डॉ. जुबेर अन्सारी, शिवसेनेतर्फे संजय म्हात्रे आणि वंदना मनोज काटेकर अशा नवीन आठ सदस्यांची निवड या महासभेत करण्यात आली असून, पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस पाच, शिवसेना दोन आणि कोणार्क विकास आघाडी एक सदस्यांची वर्णी लागली आहे. 

Web Title: The issue of the crashed Jilani building was raised in the online general meeting of Bhiwandi Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.