शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महापालिकेच्या आणखी एका विभागास आयएसओ मानांकन 

By धीरज परब | Updated: December 31, 2022 18:15 IST

यापूर्वी पालिकेच्या अग्निशमन, आस्थापना, सामान्य प्रशासन व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागास आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी पालिकेच्या अग्निशमन, आस्थापना, सामान्य प्रशासन व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. 

महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी घरत यांनी माहिती देताना सांगितले कि, आयुक्त दिलीप  ढोले यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरीकांना त्यांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाचे विकेंद्रीकरण करुन त्यातील कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी पावले उचलली आहेत.  त्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले.  महापालिकेच्या विभागांना आयएसओ दर्जा देण्याकरीता पालिकेने  दि एन क्वालिटी सर्व्हिसेस या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या कंपनीद्वारे सुकाणू समितीची स्थापना करून मुख्य समितीत ४ उपसमित्या स्थापन केल्या. या उपसमित्या संबंधित विभागांचे डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड व हाऊसकिपींग, ट्रेनिंग, फिडबॅक देणे आदी कामे करतात. 

विभागातील प्रत्येक विषयाच्या विस्तृत व मुद्देसूद लिखाणासह प्रत्येक पदांच्या जबाबदाऱ्या व अधिकार निश्चित करण्यात आले. विभागांतील संकलनानुसार अभिलेख यादी तयार करुन कक्ष अद्यावत करण्यात आला. कक्ष व कार्यालयातील पदनिहाय प्रशिक्षणाच्या विषयांची यादी तयार करुन त्याचे वार्षिक नियोजन करण्यासह वैयक्तिक प्रशिक्षणाच्या नोंदी प्रत्येक विभागात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळेच  आयएसओ मानांकन प्रमाणित करून देणारी आयआरक्लास सिस्टम अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत पालिकेच्या ५ विभागाना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. 

आयएसओ मानांकन प्राप्त झाल्या बद्दल आयुक्त ढोले यांच्या हस्ते प्रभारी मुख्य लेखा परीक्षक मंजिरी डिमेलो, लेखापरीक्षक  चारुशीला खरपडे व  सेवानिवृत्त लेखा परीक्षक मधुकर सुर्वे आणि के. व्ही. संखे यांचे अभिनंदन करण्यात आले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर