शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर प्रयोगशाळा आहे का? परिवहन मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:00 IST

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील बाहेरून नेते येऊन त्याला धार्मिक वळण देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर ही प्रयोगशाळा आहे का?  असा संतप्त सवाल परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. बाहेरून येऊन भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना रोखा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे पोलिसांना सांगितल्याचे ते म्हणाले. 

मीरारोडच्या माशाचा पाडा भागात डाचकुल पाडा येथे मोठ्या संख्येने रिक्षाआडव्या तिडव्या लावून रस्त्यात अडथळा आणला जातो. त्यावरून रिक्षा चालक आणि रहिवाशी यांच्यात वाद सुरू होता. २१ ऑक्टोबरच्या पहाटे तेथील रिक्षा उभ्या केल्यावरून वादावादी झाली आणि तेथील सुमारे २५ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यातून रिक्षा चालकांच्या टोळीने दांडे, शस्त्र सह येऊन तेथील चौघांना मारहाण केली. 

मारहाणीच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. त्यावेळी रहिवाश्यांनी,  रिक्षावाल्यांनी स्वतःच रिक्षा फोडल्याचा आरोप केला. जखमी सुमित शाह याच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी ५५ ते ६५ रिक्षा चालक आदींवर गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक केली. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन हा लव्ह आणि लँड जिहादमधून झालेला प्रकार असून विशिष्ट गटाला लक्ष्य करत त्यांची अनधिकृत बांधकामे तोडण्याची आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली. 

एमआयएमचे वारीस पठाण हे शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीस उपायुक्त कार्यालयात मोठ्या संख्येने रिक्षावाल्यांसह जमले आणि त्यांनी रिक्षा फोडणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय दबावा खाली एकतर्फी कारवाई केली गेली असा आरोप केला. तोडफोड करणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा असे पठाण यांनी सांगितले. 

मंत्री सरनाईक यांनी सांगितले कि,  महापालिका निवडणुका असल्याने जाणीवपूर्वक काहीजण वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या येऊन काहीही बोलून जातात. एमआयएमचे वारीस पठाण आले त्यांचा शहराशी काय संबंध. या आधी जे पी संकुल प्रकरणी मंत्री नितेश राणे येऊन काहीपण बोलून गेले. सपाचे अबू आझमी येणार होते त्यावेळी आपण त्यांना कॉल करून येऊ नका सांगितले. या बाबत मुख्यमंत्री यांना सांगणार आहे की बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना शांतता हवी आहे. मी आणि नरेंद्र मेहता असे दोन्ही शहरातील महायुतीचे आमदार शहर संभाळतोय. बाहेरच्यांनी येऊन वातावरण बिघडवण्याची गरज नाही. बाहेरून या पुढे कोणी आल्यास त्यांच्या भागात आम्हीपण जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

डाचकुल पाडा भागात आदिवासी, वन आदींच्या जमिनींवर काही भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली व गरीब लोकांना फसवले. वीज कंपन्यांना हाताशी धरून वीज जोडण्या मिळवून दिल्या. बेकायदा बोअर काढून पाणी विकले जाते. पालिका आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही म्हणून हे फोफावले. याला त्या भागातील स्थानिक काही नेते आणि पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सतत केली आहे असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Bhayandar: Lab for Religious Discord? Minister Questions Outsiders.

Web Summary : Minister Pratap Sarnaik questions if Mira Bhayandar is a lab for religious discord. He urges police to stop outsiders from inciting unrest after a clash between residents and rickshaw drivers was given a religious spin by visiting politicians. Sarnaik accuses them of disrupting the peace for political gain.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकmira roadमीरा रोडHinduहिंदूMuslimमुस्लीम