अंबरनाथच्या छाया रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघड; श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णाची उपचारासाठी तडफड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:59 PM2020-06-07T16:59:13+5:302020-06-07T17:00:06+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर वैद्यकीय व्यवस्था सतर्क होणे अपेक्षित असताना अंबरनाथ शहरातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयातील यंत्रणा पूर्णपणे डबघाईला आल्याचे दिसत आहे. 

Irresponsibility of Ambernath's chhaya hospital exposed | अंबरनाथच्या छाया रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघड; श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णाची उपचारासाठी तडफड

अंबरनाथच्या छाया रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघड; श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णाची उपचारासाठी तडफड

Next

अंबरनाथ: अंबरनाथ मधील बी. जी. छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा मिळाला असला तरी त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आपली जबाबदारी झटकत असल्याचे समोर आले आहे श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णाला कोणतेही उपचार न देता थेट मध्यवर्ती रुग्णालयआणि त्या नंतर कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. तब्बल अर्धा तास हा रुग्ण उपचारासाठी तडफडत असताना त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला साधी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर वैद्यकीय व्यवस्था सतर्क होणे अपेक्षित असताना अंबरनाथ शहरातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयातील यंत्रणा पूर्णपणे डबघाईला आल्याचे दिसत आहे. याठिकाणी रुग्णांना दाखल न करता परस्पर त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्याचा सल्ला सरसकट देण्यात येत आहे.

अंबरनाथ वांद्रापाडा परिसरात राहणारे शिंदे नावाचे गृहस्थ यांना शनिवारी दुपारी श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यांना लागली उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाने त्यांना दाखल न करता पुढे जाण्याचा सल्ला दिला. शिंदे यांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांची कोरोना चाचणी सकाळीच करण्यात आली होती. मात्र त्या चाचणीचा अहवाल येण्यास तीन दिवस लागणार असल्याने तोपर्यंत ह्या रूग्णांनी काय करावे याबाबत कोणतेही निर्देश उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेले नाही. मध्यवर्ती रुग्णालयाने नाकारल्यावर शिंदे आणि त्यांच्या पत्नी ह्या ऑटोरिक्षा ने अंबरनाथच्या छाया रूग्णालयात पुन्हा आले मात्र त्याठिकाणी देखील त्यांची कोणतीही तपासणी न करता परस्पर त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दाखल करण्याचा सल्ला दिला.

मात्र रुग्णवाहिकेच्या चिंतेत शिंदे हे तब्बल दोन तास छाया रुग्णालयाच्या आवारातच ऑटोरिक्षा मध्ये बसून राहिले त्यांची प्रकृती गंभीर असल्याची जाणवल्याने अखेर ऑटोरिक्षा चालकाने धैर्याने घेत पुन्हा त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पुन्हा त्यांना नाकारण्यात आल्याने खाजगी रुग्णवाहिकेतून त्यांना कळवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी देखील त्यांना दाखल न केल्याने अखेर शिंदे कुटुंबीय यांनी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविले. दुपारी बारा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत या रुग्णाची अवस्था बिकट झाली होती तर दुसरीकडे अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील वैद्यकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते यासंदर्भात छाया रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपलब्ध होऊ शकले नाही तर इतर डॉक्टर या संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत

Web Title: Irresponsibility of Ambernath's chhaya hospital exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.