ठाण्यात लोखंडी होर्डिंग स्टँड कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 15:17 IST2021-09-11T15:16:56+5:302021-09-11T15:17:04+5:30
ठाण्यात पाऊसाची रिपरिप सुरू असून त्यातच हवा मध्येच जोरात ये जात आहे. त्याच हवेमुळे तो स्टँड अचानक पडला

ठाण्यात लोखंडी होर्डिंग स्टँड कोसळला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील तलाव पाळीसमोर शिवाजी मैदानाबाहेर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेला लोखंडी होर्डिंग स्टँड अचानक शनिवारी दुपारच्या सुमारास जोराने आलेल्या हवेने कोसळला. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाण्यात पाऊसाची रिपरिप सुरू असून त्यातच हवा मध्येच जोरात ये जात आहे. त्याच हवेमुळे तो स्टँड अचानक पडला, त्या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,रस्त्यावर पडलेले होर्डिंग तातडीने हलविले. हा होर्डिंग स्टँड तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात होता. त्या स्टँड आजूबाजूला भाजी विक्रीसाठी फुटपाथवर महिला बसल्या होत्या. ज्यावेळी पडला त्यावेळी कोणीही त्या स्टँडच्या खाली बसले नव्हते तसेच रस्त्यावरुन वाहने ये - जा करत नव्हती.