शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या चौकडीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:48 AM

कमी कालावधीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत ७१ गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटींची फसवणूक करणा-या चौघांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली.

ठाणे : कमी कालावधीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत ७१ गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटींची फसवणूक करणा-या चौघांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. गुंतवणूकदारांनी केजीएन सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेचा तपशील, गुंतवणूक केल्यावर देण्यात आलेले प्रमाणपत्र, पावत्या व इतर कागदपत्रे घेऊन ठाणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले आहे.हारून रशिद अब्दुल सत्तार शेख (३५), मुकेश दत्तात्रेय मोरे (४२), सलमान सलीम शेख (२८) आणि नबील इक्बाल सुर्वे (२९) अशी अटक केलेल्या चौकडीची नावे आहे. या चौघांनी केजीएन सिक्युरिटी, केजीएन सिक्युरिटीज या योजनांचा जाहिरातींद्वारे, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे प्रचार केला. गुंतवणूकदारांना विविध मासिक व मुदत ठेवींच्या आकर्षक गुंतवणूक योजनेंतर्गत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून मनी सर्क्युलेशन स्किम सुरू केली.मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून गुंतवणूकदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे परताव्याची रक्कम व मूळ रक्कम परत न देता ७१ गुंतवणूकदारांकडून १२ कोटी रुपये जमा करत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या पथकाने मुलुंड येथील हारून शेख आणि कळव्यातील मुकेश मोरे या दोघांना ५ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यानंतर मुंब्य्रातील सलमान शेख आणि नबील सुर्वे यांना ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. या चौकडीला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.