शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

ठाण्यात बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:12 PM

बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास दहा बंगले आणि चांगला नफा देण्याची बतावणी करून ठाण्यातील कोलशेत येथील एका व्यवसायिकाला एक कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडयातील घटनाकल्याण मुरबाड रोडवरील प्रोजेक्टदोन महिला संचालकांविरुद्ध गुन्हा

ठाणे :  कल्याण मुरबाड रोडवरील बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास दहा बंगले आणि चांगला नफा देण्याची बतावणी करून ठाण्यातील कोलशेत येथील एका व्यवसायिकाला एक कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सेटर्न ब्ल्यू रिआलिटी प्रा. लि. या कंपनीच्या दोघा महिला संचालिकांविरोधात सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल झालेल्या दोघा महिलांनी अशाच प्रकारे अन्य दोघांचीदेखील १२ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोलशेत येथील द्विंकल टॉवरमध्ये राहणारे दीपक कतीरा (४९) या व्यवसायिकाची राम मारूती रोडवरील सेटर्न ब्ल्यू रिआलिटी प्रा. लि या कंपनीच्या संचालिका योगिता अभिजित सावरतकर (३३) आणि छाया प्रकाश माने (५८) यांच्याशी जून २०१५ मध्ये ओळख झाली होती. या दोघींनी कतीरा यांना मुरबाड येथील एका बंगल्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास १० बंगले आणि गुंतवणुकीवर नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कतीरा यांनी जून २०१५ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत एकूण एक कोटी २० लाख रु पये दोघींना वेळोवेळी गुंतवणुकीसाठी दिले. मात्र या तथाकथित कंपनीच्या दोघा संचालिकांनी प्रोजेक्ट सुरूच केला नाही. गुंतवणूक केलेली रक्कमदेखील परत न करता कतीरा यांची फसवणूक केली. दरम्यान, दोघींनी अशाच प्रकारे मुस्तफा विकरअली मसालावाला यांच्याकडून ११ लाख ५० हजार रु पये आणि प्रशांत तेलंग यांच्याकडून दोन लाख रु पये गुंतवणुकीच्या नावावर घेऊन त्यांचीदेखील फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. याप्रकरणी दीपक कतीरा यांनी दिलेल्या तक्र ारीनंतर नौपाडा पोलिसांनी सेटर्न ब्ल्यू रियालिटी प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका योगिता सावरतकर आणि छाया माने यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजी