शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार लागणाऱ्या आगीची सखोल चौकशी करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:04 IST

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात वारंवार लागणाऱ्या आगीची चौकशी करण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देपालिकेत लागणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करा - मनसेया आधीही महेश कदम यांनी पालिकेकडे फायर ऑडिटची केली होती मागणीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील शहर विकास विभागात वारंवार आग लागत असून त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल तयार करावा आणि संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.            ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागातील गैरव्यवहारामुळे व भ्रष्टाचारामुळे महापालिका इमारत आगीच्या सावटाखाली असून  महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकारी आणि विकासक यांच्यातील संगनमताने झालेले गैरव्यवहार जनतेसमोर येण्याची कुणकुण संबंधित अधिकारीवर्गाला पुन्हा लागली आहे. त्यामुळे या संदर्भातील फाईल्स व कागदपत्रे गहाळ होऊ शकतात. याकरिता आग लावली गेली का  शॉर्टसर्किट झाले याची संपूर्ण सखोल चौकशी व अहवाल तयार करून संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी केली. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून शहरविकासमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली असून त्यात कोरोनाच्या कामासाठी अनेकजण हे कार्यालयात येत सुध्दा नाही. तसेच १ जून नंतर अनेक विकासक व वास्तुविशारद शहरविकास मध्ये उपस्थित होते. त्यामुळे १ जून ते आतापर्यंतच्या काळात शहरविकास विभागाचे सीसीटीव्ही फुटेज सुध्दा तपासणी करावे. जेणेकरून कोण कधी आले कोण कधी हे सुध्दा माहीत पडेल असेही कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. या आधीही कदम यांनी फायर ऑडिटची मागणी केली होती. मी 26 फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयातील सर्व विभागांचे फायर ऑडिट करावे जेणेकरून भविष्यातील जीवितहानी टळेल आणि कागदपत्रे सुरक्षित राहतील परंतु पालिकेने तसे केले नाही असे कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका