शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:54 IST

दोन गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : जेष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून, हातचालाखीने फसवणुक करुन, सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चार आरोपींच्या सराईत आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि श्रीराम करांडे यांनी गुरुवारी दिली आहे.

टाकी रोडवरील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या जेसी रॉड्रीक्स (५९) यांची १२ ऑक्टोबरला संध्याकाळी बतावणी करून फसवणूक केली होती. त्या घटनेच्या दिवशी चेतन बार ते केएमपीडी कॉलेजच्या रोडवर असताना त्यांना रस्त्यात दोन आरोपी भेटले होते. आरोपींनी त्यांना त्यांच्याजवळील ५ लाख रुपयांचे कागदी खोटे बंडल देऊन त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चेन खोटी बतावणी करून फसवणूक केली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांपासून जेष्ठ नागरीकांना बोलण्यात गुंतवून अशाच प्रकारे बतावणीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचना च आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीनने सुरु केला. दरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच बातमीवरुन आरोपी शंकर राय (३७), मंगल सिलावट (३७), सचिन राठोड (२२) आणि राजुराव राय (२५) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपास केल्यावर दोन गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांतील फसवणूक झालेले सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे साडे चार तोळे वजनाचे सर्व सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी सध्या विरार पोलीस ठाण्याचे पोलीस कोठडीमध्ये आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी