शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील गोवर - रूबेला लसीकरणावर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:20 IST

जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ३५ जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यावर या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी अटलांटा युएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या कामकाजाच्या पहाणीस प्रारंभ केला आहे. त्यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व महापालिकां, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रूग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकाना गोवर, रूबेला लसीकरण करण्याचे उद्दीष्ठआतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना गोवर रु बेला प्रतिबंधात्मक लस पहाणी करण्यासाठी परदेशातील अटलांटा युएस येथील आंतरराष्ट्रीय निरीक्षक डॉ. कॉलीन ह्या ठाणे येथे उपस्थित

ठाणे : जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकाना गोवर, रूबेला लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. यानुसार लसीकरण गांभीर्याने व सुरळीत होत आहे की नाही, याची पहाणी करण्यासाठी परदेशातील अटलांटा युएस येथील आंतरराष्ट्रीय निरीक्षक डॉ. कॉलीन ह्या ठाणे येथे उपस्थित झाल्या आहेत. त्यांनी प्रथम ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागस भेट देऊन या मोहिमेच्या कामाची पहाणी केली.जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ३५ जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यावर या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी अटलांटा युएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या कामकाजाच्या पहाणीस प्रारंभ केला आहे. त्यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व महापालिकां, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रूग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. संबंधीत आरोग्य यंत्रणांकडून लसीकरणाचे काम गांभीर्याने होत आहे की नाही, याकडे त्यां कटाक्षाने लक्ष देत असून वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पहाणी दौऱ्यानंतर त्यांनी  सायंकाळी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व सिव्हील रूग्णालयास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी डॉ. कोलीन यांचे स्वागत केले. यावेळी देखील त्यांनी जिल्ह्याभरातील वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात ठाणेसह रायगड, पालघर या तीन जिल्हह्यातील लसीकरणाचे काम सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना गोवर रु बेला प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. जिल्ह्याच्या ज्या भागात लसीकरणास प्रतिसाद कमी आहे तिथे तो वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेघे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यzpजिल्हा परिषद