अल्पसंख्याक बांधवांशी दरेकरांचा संवाद
By Admin | Updated: October 11, 2014 03:25 IST2014-10-11T03:25:00+5:302014-10-11T03:25:00+5:30
कांदिवली पूर्व लक्ष्मीनगर येथील मुस्लीम व दलित बांधवांशी मागाठाणे मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी संवाद साधला

अल्पसंख्याक बांधवांशी दरेकरांचा संवाद
मुंबई : कांदिवली पूर्व लक्ष्मीनगर येथील मुस्लीम व दलित बांधवांशी मागाठाणे मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी संवाद साधला. या वेळी जाहीर सभेत या दोन्ही समुदायांनी दरेकरांना पाठिंबा दर्शविला आहे.
कांदिवली पूर्व लक्ष्मी नगर येथे दरेकरांनी मुस्लीम आणि दलित बांधवांशी संवाद साधण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत लक्ष्मी नगर येथील मुस्लीम समाजाच्या तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला. या सभेत दरेकरांनी लक्ष्मी नगर येथे केलेल्या कामाची माहिती देऊन परत एकदा संधी देऊन विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या सभेमध्ये मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर, उपविभाग अध्यक्ष जयप्रकाश गोडांबे, सुचित्रा पेडणेकर, समाजसेवक रहिम खान, धीरजलाल बारोट, नवाबभाई, शाखा अध्यक्ष संजय घाडगे, संंजय पाटील, जयश्री वळवी, मनविसेचे उपविभाग अध्यक्ष रईस शेख, उपशाखा अध्यक्ष रोयफ शेख, राकेश चवाथे, लक्ष्मण सणस, मदन वाजे, मिर्झा गु्रपचे अझर बेग, कल्याण बॉइजचे फारुख पठाण, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)