शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

विमा कंपनी बळीराजाला लूटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

कापणी सुरू झाली तरी पंचनामे नाही; महसूल, कृषी खात्याची साथ; भरपाई मिळणार कशी

- हितेन नाईक

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने करपून गेलेल्या भातशेतीचे पंचनामे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तातडीने न केल्याने व कृषी आणि महसूल खातेही याबाबत निष्क्रिय असल्याने विमा उतरवूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. कारण शेतकºयांनी भाताची कापणी सुरू केली आहे. कापणी केल्यानंतर वाया गेलेल्या पिकाचे पंचनामे होऊ शकणार नाहीत. आणि शेतकºयांना भरपाईही मिळू शकणार नाही. यातून विमा कंपनीचा करोडोंचा फायदा होईल. तर शेतकरी भरपाई मिळण्यास पात्र असूनही ती पासून वंचित राहतील. वास्तविक कृषी आणि महसूल खात्याने पिक करपताच विमा कंपनीला जागे करून या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक होते. परंतु त्यांचीही मिलीजुली असल्याने ते निष्क्रिय राहीले त्यामुळे विमा उतरवून व त्याचे हप्ते भरूनही बळीराजा भरपाईपासून वंचित राहीला. तर विमा कंपनीचा कोट्यवधीचा फायदा झाला.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडी खाली येत असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात ७५ हजार ०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची पुनर्लागवड करण्यात आल्याचे कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ह्यावर्षी जूनमध्ये ५२४.२ मिमी, जुलैमध्ये १५१९.४ मिमी, आॅगस्टमध्ये ३५२.२ मिमी, सप्टेंबरमध्ये ३९.९ मिमी असा एकूण २३१४.६ मिमी पाऊस झाला. जून महिन्यात लावलेली भातशेती चांगल्या पावसामुळे बहरली असतांना अचानक शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने पाण्या अभावी संपूर्ण हळवी व गरवी पिके करपून गेली.शेतकºयांनी खरीप हंगामासाठी सहकारी बँके कडून कर्ज घेतले. भात शेती करपल्याने हातात काहीच उत्पन्न पडणार नसल्याने या कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आ वासून उभा राहिला आहे. जिल्हाधिकाºयांनी विमा कंपनी सोबत बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करण्यात आले नसल्याचे पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी ह्यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात केंद्र शासनाच्या नॅशनल सेंटर फोर क्रॉप फॉरकास्टिंग संस्थे कडून गावातील पाण्याची सद्यस्थिती,पाण्याची पातळी,पिकाची परिस्थिती आदीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून पालघर, तलासरी, विक्रमगड तालुक्यांना टंचाई सदृश्य गावे घोषित करण्यात आली होती.अशा १० टक्के गावांची पाहणी समितीने करून अहवाल पाठविल्या नंतर ही गावे दुष्काळ सदृश्य जाहीर केली आहेत. अशा जाहीरकेलेल्या गावांपैकी दांडी, नानिवली, सरावली, काटाळे, कोळगाव, दापोली आदी भागात भातशेतीची अत्यल्प प्रमाण असतानाहीत्यांचा समावेश करण्यात आल्याने उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,तालुक्यातील सर्व गावामध्ये पीक पाहणी करून पंचनामे करावेत,अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.कापणीनंतर पंचनामे होणार तरी कसे?पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स लिमिटेड कंपनीने शेतकर्यांचे पिकविमे उतरविले असून ह्या टंचाईग्रस्त सदृश्य परिस्थिती नंतर तात्काळ पीक पाहणी करून पंचनामे करणे आवश्यक होते.मात्र अजूनही या कंपनीने पंचनामे सुरू केलेले नाहीत. काही शेतकºयांनी कापणीलाही सुरुवात केल्याने अशा शेतकºयांना भरपाईपासून वंचित राहण्याची पाळी उद्भवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा