बसचालकावर कारवाई करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST2021-06-25T04:28:21+5:302021-06-25T04:28:21+5:30

मुंब्रा : रेल्वेस्थानकासमोरील निर्धारित बसथांब्यावर टीएमटीची बस न थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना बुधवारी दुपारी ...

Instructions to take action against the bus driver | बसचालकावर कारवाई करण्याचे निर्देश

बसचालकावर कारवाई करण्याचे निर्देश

मुंब्रा : रेल्वेस्थानकासमोरील निर्धारित बसथांब्यावर टीएमटीची बस न थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या बसचालकावर (एमएच ०४,केएफ १७६४) शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश परिवहनचे उपव्यवस्थापक शशिकांत धात्रक यांनी मे. सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आनंदनगर येथील मुख्य प्रवर्तक अनिल शर्मा यांना दिले आहेत.

परिवहन सेवेची जनमानसातील प्रतिमा या प्रकारामुळे मलीन झाल्यामुळे या बसचालकावर कारवाई करण्याची मागणी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य शमीम खान यांनी केली होती. त्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून हे निर्देश दिले आहेत.

Web Title: Instructions to take action against the bus driver